मुंबई : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर चुलत भावानेच अत्याचार केल्याची घटना पवई परिसरात घडली. याप्रकरणी २३ वर्षांच्या आरोपी भावाविरुद्ध पवई पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी १५ वर्षांच्या पिडीत मुलीचा चुलत भाऊ असून तो मुळचा उत्तर प्रदेशमधील आझमगढचा रहिवाशी आहे.
हेही वाचा >>> नायर रुग्णलयात रुग्णांना वेळेवर मिळेना जेवण! स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त
आरोपीने १ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत पिडीत मुलीला त्याच्या घरी आणले होते. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाही तर तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. बदनामी आणि भावाच्या जिवावर असलेला धोका लक्षात घेऊन तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र अलीकडेच तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात ३७६ (२), (एफ), (३), (डी), (२), ५०६ (२), ३२३ भादवी सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
© The Indian Express (P) Ltd