मुंबई : दैनंदिन जीवनातील धावपळ, ताणतणाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, तसेच नैराश्य यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२२ मध्ये विभाग स्तरावर मोफत शिव योग केंद्रे सुरू केली. या शिव योग केंद्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या केंद्रांमध्ये वर्षभरात तब्बल १५ हजार नागरिकांनी योग प्रशिक्षण घेतले.

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या संकल्पनेत शारीरिक स्वास्थासह मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यालाही महत्त्व दिले आहे. सध्यस्थितीत दैनंदिन कामातील धावपळ व ताणतणावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, तसेच नैराश्य यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे २०२२ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने विभाग स्तरावर मोफत शिव योग केंद्रे सुरू केली. या शिव योग केंद्रांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा मिळणार प्रतिसाद पाहून मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागात एकूण १३१ शिव योग केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा? (फोटो सौजन्य @Freepik)
Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Which is the best time to exercise
तुम्हालाही व्यायामाची आवड आहे? मग, थांबा… कधीही व्यायाम केल्याने उदभवू शकतात गंभीर समस्या
Simple neck massage for headache and dizziness expert advice
डोकेदुखी आणि चक्करचा त्रास कायमचा होईल कमी! फक्त काही मिनिटे करा मानेचा ‘हा’ मसाज, तज्ज्ञांनी सांगितले फायदे
story of Dr. Anand Nadkarni
ऊब आणि उमेद: ऊर्जायात्रा
Best exercises for hair
मजबूत, चमकदार केस हवेत? मग दररोज ‘ही’ दोन योगासने न चुकता करा
408 people committed suicide in Dhule district during 2024
धुळे जिल्ह्यात वर्षभरात ४०८ जणांची आत्महत्या; पुरुषांची संख्या सर्वाधिक
Health Massage
Health Special: अभ्यंग विधी कसा करावा? त्याचे फायदे कोणते? हा विधी कुणी करू नये?

हेही वाचा >>> ‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील आणखी सात हेक्टर जमिनीची आवश्यकता, एमएमआरडीएची राज्य सरकारकडे मागणी

जून २०२२ पासून आजपर्यंत एकूण १५ हजार ७७ नागरिकांनी या केंद्रांमध्ये योग प्रशिक्षण घेतले. तसेच सध्या ६ हजार १६३ नागरिक योग प्रशिक्षण घेत आहेत. यंदा ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेवर संकल्पनेवर आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त राहावी या दृषटीकोनातून आंतरराष्ट्रीय योग दिनी मुंबई महानगरातील २४ विभाग कार्यालयांतील सर्व शिव योग केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विभाग स्तरावरील शिव योग केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये योगासनांविषयी माहिती व निरोगी आयुष्याबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता सर्व विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी योग प्रशिक्षण संस्थांसोबत समन्वय साधून आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत.

Story img Loader