मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे आतापर्यंत १५० गाडय़ा रवाना होतील. यामध्ये रविवारी ७० गाडय़ा सुटल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. राज्य सरकारने विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याचीही परवानगी दिली आहे. मध्य, पश्चिम रेल्वेने विशेष गाडय़ांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला असून त्या सुटण्याची प्रतीक्षा आहे. या गाडय़ा ११ ऑगस्टपासून सोडण्याचे नियोजन रेल्वेने के ले आहे.

खासगी बस, चारचाकी वाहनांनी अनेकजण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणाकडे रवाना झाले आहेत. खासगी वाहनानंतर उशिरा का होईना राज्य सरकारने एसटीपाठोपाठ रेल्वेही सोडण्यासाठी मंजुरी दिली. एसटीला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ८ ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागांतून ८० गाडय़ा सुटल्या होत्या. रविवारी ७० बस रवाना होणार असल्याचे महामंडळाने सांगितले. १२ ऑगस्टपर्यंत ८ हजार प्रवाशांनी गणपती उत्सवासाठी आरक्षण के ले आहे. यासाठी तीन विभागांतून ४०० गाडय़ा सोडण्याची तयारी महामंडळाने ठेवली आहे. एसटीचे ग्रुप आरक्षणही उपलब्ध के ले असून ३० बस आरक्षणासाठी नोंदविल्या आहेत. कोकणातून २३ ऑगस्टपासून परतीच्या प्रवासासाठी महामंडळाने आगाऊ आरक्षणही उपलब्ध के ले आहे. परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान, विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या गाडय़ा ११ ऑगस्टपासून सोडण्याचे नियोजन रेल्वेने के ले आहे. परंतु याबाबत सोमावापर्यंत निर्णय होईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सीएसएमटी ते सावंतवाडी, एलटीटी ते सावंतवाडी, एलटीटी ते रत्नागिरी, मुंबई सेन्ट्रल ते सावंतवाडी, वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी इत्यादी गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

Story img Loader