मुंबई: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ब्रिटिशकालीन शेठ गोकुळदास तेजपाल ( जी. टी.) रुग्णालयाला उद्या सोमवारी दीडशे वर्षे पूर्ण होत असून आगामी वर्षात या रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे. शेठ गोकुळदास तेजपाल यांनी त्याकाळी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगी मधून जी. टी. रुग्णालयाची उभारणी झाली होती.

सुरुवातीच्या काळात १२० खाटांचे असणारऱ्या या रुग्णालयात आज ५२० खाटा असून करोनाकाळात या रुग्णालयात ३०६० करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. विशेष म्हणजे करोनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील बहुतेक सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना करोना होऊनही त्यातून बरे होताच या सर्वांनी रुग्ण सेवेला वाहून घेतले होते. उद्या सोमवारी रुग्णालय १५१ व्या वर्षात पदार्पण करत असून या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ म्हैसकर तसेच जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभमध्ये सहभागी होणार; २ लाख कोटींच्या उलाढालीची शक्यता; योगी सरकारची तिजोरी भरणार
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
Prataprao Jadhav
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार, ICMR कडून संशोधन सुरू, केंद्रीय मंत्र्याची माहिती
vn desai hospital
मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय

हेही वाचा…नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…

रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम ८ एप्रिल १८७४ रोजी पूर्ण होऊन तत्कालीन गव्हर्नर फिलिप एडमंड वोडेहाऊस यांच्या हस्ते करण्यात आले होते. येथे प्रिन्स ऑफ वेल्स व मुख्य सर्जिकल इमारत अशा हेरिटेज इमारती असून आजमितीस येथे मेडिसिन विभागासह, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंगोपचार, कान, नाक व घसा विभाग, छाती व क्षयरोग विभाग, प्लास्टिक सर्जरी विभाग तसेच २४ तास सुरु असलेली रक्तपेढी आदी अनेक विभाग कार्यरत आहेत. येथील बाह्यरुग्ण विभागात वर्षाकाठी काही लाख रुग्णांवर उपचार केले जातात तसेच तृतीय पंथीयांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या आवाज बदलाच्या शस्त्रक्रियाही येथे केल्या जात असून आगामी काळात दोन हजार चौरस फुट जागेत २५ खाटाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

हेही वाचा…मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

आगामी वर्षात या रुग्णालयात १०० प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच शासनाच्या आवश्यक त्या परवानगी मिळाल्या आहेत. आता केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परवानगी बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. जी. टी. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी दर बुधवारी ठाणे येथील अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ भालचंद्र चिखलीकर यांनी सांगितले. आगामी काळात अधिक परिणामकारक रुग्णसेवा देण्याच्या दृष्टीने रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटरसह सुपर स्पेशालिटी विभाग सुरु करण्याचा मनोदय डॉ चिखलीकर यांनी व्यक्त केला.

Story img Loader