मुंबई: आंतरराष्ट्रीय शिंपिंग कंटेनर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सुमारे १६ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने बनावट वाऊचर व कागदपत्रांद्वारे कंपनीमध्ये खोट्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करून तीन महिन्यांमध्ये ही रक्कम हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

गेल्या सहा वर्षांपासून आरोपी अभिषेक महाडिक इंटरएशिया शिपिंग लाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय तैवानमध्ये आहे. या प्रकरणी तक्रार करणारे अल्बर्ट नारहोना (५९) कंपनीचे आर्थिक सल्लागार असून ते कंपनीतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामकाज पाहतात. नारहोना १० ऑगस्ट रोजी कंपनीच्या एका बँक खात्यातील नोंदी पाहत होते. त्यावेळी त्यांना १४ जुलै रोजी झालेला ८० लाख रुपयांचा व्यवहार संशयास्पद आढळून आला. त्यांनी या व्यवहाराबाबत अधिक माहिती घेतली असता ही रक्कम महाडिक याच्या पगाराच्या खात्यात जमा झाल्याचे उघड झाले. त्याचा सखोल शोध घेतल्यानंतर त्यांचा महाडिकवर संशय बळावला. त्यानंतर नरहोना यांनी कंपनीच्या बँक खात्यांतील मागील सहा महिन्यांच्या नोंदी तपासल्या. त्यावेळी १२ मे ते ९ ऑगस्ट दरम्यान महाडिक यांनी १७ कोटी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले.

torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune college admission fraud
पुणे: महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
pune cyber crime latest news
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक
mumbai bank fraud andheri midc
Mumbai Bank Fraud: मुंबईत सहा बँक कर्मचाऱ्यांचा ठेवीदारांच्या निधीवर डल्ला; अंधेरीतील शाखेतला प्रकार, गुन्हा दाखल!
job , post department , fake marksheet,
बनावट गुणपत्रिकेद्वारे टपाल खात्यात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न, फसवणूकप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
ED seized property in bank fraud case
२२० कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून ७९ कोटींची मालमत्तेवर टाच
6 arrested for 40 lakh medical college admission scam
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा >>>मुंबई : भायखळा येथे चाकूने गळ्यावर वार करून मजुराची हत्या

तपासणीत आरोपीने पीडीए ॲडव्हान्स, रिफंड व इंटेरेसिया या नावाने बनावट वाऊचर बनवले आणि त्यासोबत त्यांनी बनावट ई-मेल, टॅली व्हाउचर आणि परताव्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे बनवली. त्या माध्यमातून आरोपीने या रकमेचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने एक कोटी एक लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम परत करण्यात अपयशी ठरल्यामुळे कंपनीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. सहार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची रक्कम १० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यामुळे याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

Story img Loader