उपनगरी रेल्वेच्या प्रथम आणि द्वितीय वर्गाच्या मासिक आणि त्रमासिक पासचे भाडे गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार २२ जानेवारीपासून लागू होणारे किमान अंतरासाठीचेही भाडे वाढले असले तरी मासिक आणि त्रमासिक पासामध्ये १६ ते २० किमी अंतरामधील स्थानकांच्या दरात मात्र कपात झाली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते घाटकोपर अंतराचा मासिक अथवा त्रमासिक पास हा १५ ते ४५ रुपयांनी कमी झाला आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते शीवपर्यंतचा पास मात्र वाढला आहे.
रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या भाडेवाढीनंतर आता अधिकृतरित्या मासिक आणि त्रमासिक पासाचे दर जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच अंतराच्या स्थानकांचे दर वाढले असले तरी १६ ते २० किमीच्या अंतरातील स्थानकांचे दर कमी झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. प्रथम वर्गाच्या दरात मात्र अशी कपात झाली नसून मासिक पासात पाच तर त्रमासिक पासामध्ये १० रुपयांची सरासरी वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या पासाचे दर पुढीलप्रमाणे
स्थानके मासिक त्रमासिक
सीएसटी-भायखळा ८५ २३०
सीएसटी-दादर ८५ २३०
सीएसटी-कुर्ला ११५ ३२०
सीएसटी-घाटकोपर ११५ ३२०
सीएसटी-ठाणे १९० ५२५
सीएसटी-डोंबिवली २६५ ७२५
सीएसटी-कल्याण २८० ७७०
सीएसटी-कसारा ४४५ १२२०
सीएसटी-कर्जत ३५५ ९७५
सीएसटी-वाशी २४० ६७५
सीएसटी-पनवेल ३३५ ९२५
मध्य रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या पासाचे दर पुढीलप्रमाणे
स्थानके मासिक त्रमासिक
सीएसटी-भायखळा २९० ७९०
सीएसटी-दादर २९० ७९०
सीएसटी-कुर्ला ४९५ १३५५
सीएसटी-घाटकोपर ४९५ १३५५
सीएसटी-ठाणे ६४५ १७६०
सीएसटी-डोंबिवली ८५० २३२०
सीएसटी-कल्याण ९५५ २६१०
सीएसटी-कसारा १७२० ४६७५
सीएसटी-कर्जत १४६० ३९७०
सीएसटी-वाशी ७०० १९५०
सीएसटी-पनवेल १०२५ २८४०
पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या पासाचे दर
स्थानके मासिक त्रमासिक
चर्चगेट-एल्फिन्स्टन रोड ८५ २३०
चर्चगेट-दादर ११५ ३२०
चर्चगेट-वांद्रे ११५ ३२०
चर्चगेट-अंधेरी १९० ५२५
चर्चगेट-कांदिवली १९० ५२५
चर्चगेट-बोरिवली १९० ५२५
चर्चगेट-भाइंदर १९० ५२५
चर्चगेट-वसई रोड २८० ७७०
चर्चगेट-नालासोपारा २८० ७७०
चर्चगेट-विरार २८० ७७०
पश्चिम रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या पासाचे दर
स्थानके मासिक त्रमासिक
चर्चगेट-एल्फिन्स्टन रोड २९० ७९०
चर्चगेट-दादर ४२५ ११६०
चर्चगेट-वांद्रे ४२५ ११६०
चर्चगेट-अंधेरी ५६५ १५४०
चर्चगेट-कांदिवली ६४५ १७५५
चर्चगेट-बोरिवली ६४५ १७५५
चर्चगेट-भाइंदर ७८५ २१३०
चर्चगेट-वसई रोड ९५५ २६००
चर्चगेट-नालासोपारा १०२० २७८०
चर्चगेट-विरार १०२० २७८०