उपनगरी रेल्वेच्या प्रथम आणि द्वितीय वर्गाच्या मासिक आणि त्रमासिक पासचे भाडे गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार २२ जानेवारीपासून लागू होणारे किमान अंतरासाठीचेही भाडे वाढले असले तरी मासिक आणि त्रमासिक पासामध्ये १६ ते २० किमी अंतरामधील स्थानकांच्या दरात मात्र कपात झाली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते घाटकोपर अंतराचा मासिक अथवा त्रमासिक पास हा १५ ते ४५ रुपयांनी कमी झाला आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते शीवपर्यंतचा पास मात्र वाढला आहे.
रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या भाडेवाढीनंतर आता अधिकृतरित्या मासिक आणि त्रमासिक पासाचे दर जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच अंतराच्या स्थानकांचे दर वाढले असले तरी १६ ते २० किमीच्या अंतरातील स्थानकांचे दर कमी झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. प्रथम वर्गाच्या दरात मात्र अशी कपात झाली नसून मासिक पासात पाच तर त्रमासिक पासामध्ये १० रुपयांची सरासरी वाढ झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा