गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार सीबीडी येथे उघडकीस आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या १७ जणांची सुमारे एक कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सीबीडीतील गौरी कॉम्प्लेक्स येथे सॉफ्टेक कंपनीच्या नावाने थॉमस रेड्डी याने कार्यालय थाटले होते. कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रति महिना अडीच टक्के व्याज देण्यात येईल, असे थॉमस यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते.
यावर विश्वास ठेवत खारघर येथे राहणाऱ्या मुग्धा पाटील यांच्यासह अनेकांनी ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१३ दरम्यान या कंपनीत आíथक गुंतवणूक केली होती, परंतु ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे व्याज देण्यास रेड्डी याने टाळाटाळ केली. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्येच रेड्डी हा कार्यालय बंद करून परागंदा झाला.
नवी मुंबईत १७ जणांना दीड कोटींना गंडा
गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार सीबीडी येथे उघडकीस आला आहे.
First published on: 27-05-2014 at 02:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 men cheated for 1 5 cr in the name investment