मालाड पश्चिम येथील तलावात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रेहमान रिझवान अन्सारी(१७) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अन्सारी मालवणी परिसरातील अमन वेल्फेअर सोसायटी येथील रहिवासी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुंबई: बॅग विक्रेत्यांकडून १० हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या दोन पोलिसांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी मित्रांसह घराजवळील शाम तलावात पोहण्यासाठी गेला होता. पण पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात गेला. पोहता येत नसल्यामुळे अन्सारी बुडू लागला. काही वेळानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत काही मित्रांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.