मुंबई येथील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील (बार्क) एका वैज्ञानिकाचा अल्पवयीन मुलगा गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता आहे. अभ्यासाचा ताण आणि नैराश्याने ग्रासल्याने तो घरातून निघून गेला असावा असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, अजूनही त्याचा तपास लागला नसल्याने त्याचे आई वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे.
Maharashtra: 17-year-old son of a Bhabha Atomic Research Centre (BARC) Scientist has been missing from Vashi since Sept 23. Mother says, "Police are cooperating with us but we haven't come across any evidence of his whereabouts. He is on treatment for depression&was recovering." pic.twitter.com/N79t5FurhI
— ANI (@ANI) September 29, 2018
नमन दत्त (वय १७) असे या बेपत्ता झालेल्या वैज्ञानिकाच्या मुलाचे नाव आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथील आपल्या घरातून निघून गेला. पोलीस त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच्या कॉल रेकॉर्डसह तो कुठे गेला असेल याची शक्यता तपासत त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यानंतर तो अद्याप घरी परतलाच नसल्याचे नमनची आई चंद्रा राममुर्ती यांनी सांगितले.
घरातील एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला मानसिक धक्का बसला होता. त्याचबरोबर अभ्यासाचाही त्याच्यावर ताण होता. यामुळे नैराश्यात गेलेल्या नमनवर काही दिवसांपासून उपचारही सुरु होते. उपचारांमुळे तो नैराश्यातून बाहेरही येत होता, अशी माहितीही त्याच्या आईने दिली आहे.