मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे कॉलनीतील १७७ झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोमवारी झाडे कापण्याची कार्यवाही केली. सोमवारी पहाटे पाच वाजता कडक पोलीस बंदोबस्तात आरेतील झाडे कापण्यात आली. याचिकाकर्त्यांनी मात्र १७७ पेक्षा अधिक झाडे एमएमआरसीने कापल्याचा आरोप करून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरेतील झाडे कापण्याचा विषय सुरुवातीपासूनच संवेदनशील ठरला आहे. आरेतील झाडे कापण्यास पर्यावरणप्रेमी आणि आरेवासीयांचा विरोध आहे. मात्र एमएमआरसी न्यायालयाकडून परवानगी घेत झाडे कापण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना दिसत आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर रात्रीच्या वेळेस २०१९ मध्ये एमएमआरसीने झाडे कापण्याची कार्यवाही केली होती. आज पहाटे पाच वाजता आरेतील झाडे कापण्यात आली आहेत.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Chandrapur forest area loksatta news
माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा

हेही वाचा >>> मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चेंबूरमध्ये तक्रार दाखल

सारीपुत नगरवरून मेट्रो गाड्या पुढे आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी आरेतील ८४ झाडे कापण्याची गरज असल्याचे सांगून एमएमआरसीने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिली. मात्र एमएमआरसीने ८४ ऐवजी १७७ झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर केला. याला आक्षेप घेऊन आरे वाचवा आंदोलनकर्त्यांनी आणि आरेतील बाधित कुटूंबाने (ज्यांची ७५ झाडे कापली जाणार आहेत त्या भोये कुटूंबाने)  याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ८४ झाडे कापण्याची परवानगी असताना १७७ झाडे कापण्याच्या एमएमआरसीच्या प्रस्तावावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करून एमएमआरसीला १० लाखांचा दंड ठोठावला. मात्र त्याचवेळी १७७ झाडे कापण्यास परवानगीही दिली. या परवानगीनुसार आज पहाटे झाडे कापण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : एकनाथ शिंदेंमुळे भाजपा रसातळाला! संजय राऊत यांचा आरोप; यासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी

एमएमआरसीने १७७पेक्षा अधिक झाडे कापली?

प्रचंड पोलीस बंदोबस्त लावत पहाटेच्या अंधारात झाडे कापण्यास सुरुवात केली. आमची ७५ झाडे कापण्यात आली आहेत. चिकू, पेरू आणि इतर फळझाडे होती. याच फळांची विक्री करत आम्ही आमचा उदरनिर्वाह करत होतो. पण आता ही झाडे कापण्यात आल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे एमएमआरसीने १७७ पेक्षा अधिक झाडे कापली आहेत. कारण ज्या झाडांवर क्रमांक नव्हता ती झाडेही कापली गेली आहेत.

आशा भोये, आरेवासीय 

झाडे कापण्याची कार्यवाही करताना वृक्ष प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी (ट्रि ऑफिसर) राहणे बंधनकारक आहे. पण आजच्या कार्यवाहीदरम्यान वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप याचिकाकर्त्या अमरिता भट्टाचार्य यांनी केला आहे. तर १७७ पेक्षा अधिक झाडे कापण्यात आल्याचा ही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान याबाबत एमएमआरसीकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.

Story img Loader