Mumbai Traffic : नवीन वर्षाचे संपूर्ण देशभरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासाठी देशभरात सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत देखील अनेक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र यादरम्यान नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत सुमारे १७,८०० लोकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवताना आढळलेल्या १५३ व्यक्तींचा देखील समावेश आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ८९.१९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक अशी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. विशेषतः नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला त्या गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बँडस्टँड आणि जुहू चौपाटी अशा ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, असे पोलि‍सांनी सांगीतले.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
buldhana crime latest marathi news
समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…
Navi Mumbai Police detained four Bangladeshi nationals living in rented room on Saturday
खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात
Ulhasnagar drink and drive case
कल्याणमधील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले उल्हासनगरच्या २६ विद्यार्थ्यांचे प्राण, मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई

योग्य वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने भक्कम उपाययोजना लागू केल्या होत्या. यादरम्यान १७,८०० लोकांना विविध नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावत ई-चलान जारी करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २,८९३ चालकांना रस्त्यावर वाहनांची पार्किंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. तर १,९२३ जणांवर हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तर १,७३१ लोकांना सिग्नल मोडल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा>> BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

कोणत्या प्रकरणात किती जणांना दंड?

वाहतुकीच्या अडथळा आणणे: २,८९३
हेल्मेटशिवाय गाडी चालवणे: १,९२३
रिफ्युजल टू प्लाय : १,९७६
ट्रॅफिकचा लाईटचा दिवा लाल असताना वाहन चालवणे: १,७३१
वन वे मध्ये गाडी चालवणे: ८६८
वेग मर्यादेचे उल्लंघन: ८४२
चालक परवान्याशिवाय गाडी चालवणे: ५८१
स्टॉप लाइनवर न थांबणे : ४४०
सीटबेल्ट न लावता गाडी चालवणे : ४३२
गणवेशात नसताना गाडी चालवणे: २००
दारू पिऊन गाडी चालवणे: १५३
मोटारसायकलवर तिघे जाणे : १२३
वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे: १०९
चुकीच्या बाजूने वाहन चालवणे:४०
हॉर्न वाजवणे : २०
धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे : २
इतर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन: ५,४६७
एकूण ई-चलान : १७,८००

Story img Loader