मुंबई लोकल ही मुंबईची लाइफलाइन म्हटली जाते मात्र मुंबईत लोकलच्या अपघातांमध्ये एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५ जानेवारीला ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६ जानेवारीलाही ९ जणांचा मृत्यू झाला. तर या दोन्ही दिवशी लोकलमधून पडून एकूण २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईची लोकल ही डेथलाइनच ठरताना दिसून येते आहे.

५ जानेवारीला दादर स्थानकाजवळच्या अपघातात एक, कुर्ला या ठिकाणी तीन, कल्याणला एक, चर्चगेटला एक, अंधेरीत एक, बोरीवलीत एक, पालघरमध्ये एक अशा एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ६ जानेवारीला झालेल्या अपघातांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी एक, कुर्ला या ठिकाणी एक, कल्याणला दोन,वडाळा या ठिकाणी एक, वाशीला एक, मुंबई सेंट्रल या ठिकाणी एक, अंधेरीत एक आणि बोरीवलीत एक अशा एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमधून जीवघेणी कसरत करत प्रवास करू नका असे आवाहन कायमच केले जाते. आता मात्र गेल्या काही दिवसात हा प्रवास धोकादायक होतो आहे असेच दिसून येते आहे. गेल्या दोन दिवसात विविध स्थानकांवर झालेल्या अपघातांमध्ये १८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. मुंबई ट्रेन अपडेट्स या ग्रुपवर ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे.

Story img Loader