लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्य दिन, शनिवार – रविवार आणि रक्षाबंधन अशी सलग सुट्टी आल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १८ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या एलटीटी – नागपूर, एलटीटी – मडगाव, सीएसएमटी – कोल्हापूर, पुणे – नागपूर आणि कलबुर्गी – बंगळुरू यादरम्यान धावतील.

Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेषच्या २ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०२१३९ वातानुकूलित अतिजलद विशेष १५ ऑगस्ट रोजी एलटीटी येथून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४० वातानुकूलित अतिजलद विशेष १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील.

आणखी वाचा-‘एमएसआरडीसी’ची म्हाडाला १,८२३ घरे; एकात्मिक नगर वसाहत योजनेद्वारे पनवेल खालापूरमधील सदनिका

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विशेषच्या २ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१४१७ विशेष गाडी २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१८ विशेष गाडी १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता कोल्हापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज हे थांबे असतील.

आणखी वाचा-झोपु कायद्याच्या फेरआढाव्यासाठी विशेष खंडपीठ, शुक्रवारपासून सुनावणी

एलटीटी – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११६७ विशेष रेल्वेगाडी एलटीटी येथून १५, १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६८ विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून १६, १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर (०११६८ साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (०११६८ साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (०११६८ साठी), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (०११६८ साठी), आणि कणकवली असे थांबे असतील.

तसेच पुणे – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या आणि कलबुर्गी – बंगळुरू विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.