दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि मुंबईतल्या महिलांवरच्या वाढलेल्या विनयभंगाच्या घटना लक्षात घेऊन येणाऱ्या ३१ डिसेंबरच्या नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. एकूणच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी तब्बल १८ हजार पोलिसांना रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईत सुरक्षा व्यवस्था कशी असावी त्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
पोलीस आयुक्त सदानंद दाते (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया, जुहू बीच आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. महिला छेडछाडविरोधी पथक प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात येणार असून, गर्दीमध्ये साध्या वेशातले पोलीसही असणार आहे. हे पोलीस स्वत: व्हिडीओ चित्रीकरणही करणार आहेत. मागील अनुभव लक्षात घेता महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल, अशी माहिती दाते यांनी दिली.
नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह राज्यात सर्वत्र मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. या काळात मद्यपी चालकांना वेळीच आळा घातला तर अपघात कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सर्व पोलीस आयुक्तालय तसेच महासंचालक संजीव दयाळ यांनी याप्रकरणी पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत दयाळ यांचा संपर्क होऊ शकला नाही.
३१ डिसेंबरच्या रात्री बंदोबस्तासाठी मुंबईच्या रस्त्यांवर १८ हजार पोलीस
दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि मुंबईतल्या महिलांवरच्या वाढलेल्या विनयभंगाच्या घटना लक्षात घेऊन येणाऱ्या ३१ डिसेंबरच्या नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. एकूणच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी तब्बल १८ हजार पोलिसांना रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-12-2012 at 03:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18thousand poice on duty for 31st night