सांताक्रूझ विमानतळाजवळील उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी भरधाव वेगात जाणाऱ्या डम्परने धडक दिल्यामुळे बेस्टची सी-७१ क्रमांकाची बस उलटली. धडकेमुळे दुभाजक ओलांडून बस पलीकडील विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले. विजेच्या खांबामुळे बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती.
बेस्टची बस क्रमांक ३७१ माहीम ते मिरा रोड दरम्यान धावते. मिरा रोडवरून निघालेली ही बस दुपारी १२च्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझ विमानतळाजवळील उड्डाणपुलावरून जात होती. त्याच वेळी डाव्या बाजूने भरधाव वेगात बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेला डम्पर बसवर आदळला. धडकेमुळे बस उड्डाणपुलावरील दुभाजक ओलांडून विजेच्या खांबाला धडकून उलटली. जखमींना तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १४ जखमींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. डम्पर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
बेस्ट बस उलटून १९ प्रवासी जखमी
सांताक्रूझ विमानतळाजवळील उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी भरधाव वेगात जाणाऱ्या डम्परने धडक दिल्यामुळे बेस्टची सी-७१ क्रमांकाची बस उलटली. धडकेमुळे दुभाजक ओलांडून बस पलीकडील विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले. विजेच्या खांबामुळे बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती.
First published on: 07-04-2013 at 02:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 hurt as best bus overturns on western express highway