मुंबई: गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने (म्हाडा) जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे तसेच कल्याणजवळ सुमारे ५४ एकर भूखंडाची राज्याच्या महसूल विभागाकडे मागणी केली गेली आहे. हे भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबवून १९ हजार घरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

मुंबईतील गिरण्यांची एक तृतीयांश जागा विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार, म्हाडाला ताब्यात मिळाल्यानंतर त्यावर गृहनिर्माण योजना राबविण्यास सुरुवात झाली. २०१२ पासून आतापर्यंत २७ गिरण्यांच्या भूखंडांवर गिरणी कामगारांसाठी १५ हजार ८७० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यापैकी ११ हजार १५८ सदनिका वितरित करण्यात आल्या असून चार हजार ७१२ सदनिका शिल्लक आहेत. नोव्हेंबर २०२३ पर्यंत गिरणी कामगारांना घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळालेल्यांची संख्या फक्त १ हजार ७१८ इतकीच आहे.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Agriculture Department prepared for Rabi season in district preparing agriculture in Konkan region for second time after paddy harvest
जिल्ह्यात ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बीचे नियोजन, २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाने आता ठाण्यातील उत्तरशीव (२७ एकर), कल्याण येथील रायते (अडीच एकर), गौरीपाडा (दोन एकर) आणि हेदुटणे (२३ एकर) असा सुमारे ५४ एकर भूखंड निश्चित केला आहे. या भूखंडावर तीन इतक्या चटईक्षेत्रफळाचा वापर करून सुमारे १९ हजार घरांची निर्मिती करता येणार आहे. या ठिकाणी एकूण ९० एकर भूखंड असला तरी त्यापैकी ५४ एकर भूखंड प्रत्यक्ष गृहनिर्माण योजनेसाठी उपलब्ध असल्याचे म्हाडातील एका उच्चपदस्थाने सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत योजनेस तत्त्वत: मान्यताही देण्यात आली.

हेही वाचा… ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या उपाययोजना काय? पोलीस आयुक्तांकडून जाणून घेण्याची पार्लेकरांना संधी

गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठाणे, कल्याणसह मुंबई महानगर प्रदेशातील तसेच राज्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील भूखंड गृहनिर्माणासाठी उपलब्ध करून द्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार म्हाडाने ठाणे व कल्याणमधील भूखंड निश्चित केले आहेत. हे भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित केल्यास या भूखंडांवर गिरणी कामगारांसाठी तातडीने गृहनिर्माण योजना राबविणे शक्य होणार आहे, असे या बैठकीत म्हाडामार्फत सांगण्यात आले. आतापर्यंत सुमारे ७६ हजार ८७८ गिरणी कामगारांनी घरांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ५९ हजार ५४९ अर्ज पात्र ठरले असून ४५२ अर्ज अपात्र ठरले. १२ हजार १४० गिरणी कामगारांकडून अधिक स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

गिरणी कामगारांच्या घरांची सद्य:स्थिती

  • २०१२ मधील सोडतीत १८ गिरण्यांच्या भूखंडावरील सहा हजार ९२५ घरे उपलब्ध. त्यापैकी सहा हजार ७५९ घरे वितरीत तर १६६ घरे अद्यापही शिल्लक.
  • २०१६ मधील सोडतीत सहा गिरण्यांच्या भूखंडावरील दोन हजार ६३४ घरे उपलब्ध. त्यापैकी दोन हजार ५२० घरे वितरीत. ११४ घरे शिल्लक.
  • एमएमआरडीएच्या दोन हजार ४१७ घरांपैकी फक्त ५१९ घरे वितरीत. १८९८ घरे शिल्लक.
  • २०२० मध्ये तीन गिरण्यांच्या भूखंडावरील तीन हजार ८९४ घरांसाठी सोडत. १३६० घरे वितरित. २५३४ घरे शिल्लक.

Story img Loader