मुंबईः चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या १९ वर्षीय तरूणीवर नरीमन पॉईंट येथील नामांकीत हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली. आरोपीने पीडित तरूणीला मारहाण करून चाकूने तिच्या तोंडात, पोटावर व मांडीवर जखमा केल्या आहेत. याप्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी बलात्कार, मारहाण व धमकावल्याचा गुन्हा दाखल करून ३८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा >>> मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या

तक्रारदार मूळची हरियाणा येथील रहिवासी आहे. आरोपीही हरियाणा येथील असून पीडित तरूणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. पीडित तरूणीचे मुंबईत चित्रीकरण असल्यामुळे ती मुंबईत आली होती. त्यावेळी आरोपीही तिच्याबरोबर आला होता. आरोपीने रविवारी रात्री नरिमन पॉईंट येथील हॉटेलमधील खोलीत तिला शिवीगाळ, मारहाण केली. तसेच तोंडात, पोटावर व मांडीवर चाकू टोचून जखमी केले. चाकूच्या साह्याने तिच्या गुप्तांगावर जखमा केल्या. याप्रकारानंतर तरूणी घाबरली. तिने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Story img Loader