मुंबईः करोना टाळेबंदीनंतर यावर्षी प्रथमच मोठ्याप्रमाणात विसर्जन सोहळा पार पडत असल्यामुळे २० हजार पोलिसांना विसर्जन स्थळ व मार्गिकांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळासह मध्य मुंबईतील दादर, लालबाग व परळ परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबई : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी हाल

हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहिसर नदीत गणेश विसर्जनाला मनाई; उच्च न्यायालयाचे आदेश

विसर्जनासाठी मुंबईत ३२०० अधिकारी, १५ हजार ५०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ कंपनी, शीघ्र कृतीदलाची एक कंपनी, फोर्स वनची एक कंपनी, ७५० गृहरक्षक, २५० प्रशिक्षणार्थी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय बाॅम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक यांनाही विविध परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू, मालाड व गणेश घाट परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत ७३ नैसर्गिक तलाव, १६२ कृत्रिम तलाव आहेत. या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय महत्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस असणार आहेत. त्याच बरोबर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार असून स्थानिक मंडळांना पोलिस दिवसाकाठी तीन ते चार वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच गणेश मंडळांनाही मंडप परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले व महिलाच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलिसांना अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे. त्यात प्रशिक्षणार्थी पोलीस, होमगार्डचे जवान,नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी असणार आहेत. याशिवाय लालबागमधील प्रमुख गणेश मंडळाच्या मार्गांवरही पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 thousand policemen immersion police security immersion sites routes mumbai print news ysh