संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या २० वर्षीय तरूणाला हटकले असता त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात घडला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरूणाला अटक केली. तक्रारदार पोलीस शिपाई विशाल सोनजे विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते सोमवारी रात्री कर्त्यव्यावर असताना विक्रोळी टागोर नगर परिसरात एक तरूण संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जात असताना त्यांना दिसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> विदेशी घड्याळ अपहाराप्रकरणी आरोपीला ४८ तासांत अटक; बोरिवली पोलिसांची कारवाई

सोनजे यांनी तरूणाला थांबवले व सळ्यांबाबत विचारले असता तो संतापला. त्याने सोनजे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सोनजे यांनी अखेर त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने सोनजे यांच्या हाताचा चावा घेतला. तसेच तेथे उपस्थित रिक्षाचालक लियाकत याच्याही डाव्या हातालाही तो चावला. याप्रकरणानंतर तरुणाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याचे नाव मल्लेश कांबळे (२०) असल्याचे समजले. तो विक्रोळी कन्नमवारनगर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, तैनात पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी मंगळवारी कांबळेला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात गेल्यावर्षी विक्रोळी पोलीस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सोनजे व लियाकत दोघांनाही विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.