मुंबई :  मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या कथित २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. गृहनिर्माण आणि सल्लागार क्षेत्रात २० वर्षांचा अनुभव असलेल्या रिअल्टर्स नेटवर्क या कंपनीने ही याचिका केली आहे. कंपनीने व्यवस्थापकीय संचालक नटराज कृष्णन् यांच्यामार्फत ही याचिका केली असून आपली कंपनी लोढा यांच्यासह अनेक विकासकांकडे नोंदणीकृत असल्याचा दावा केला आहे. २०१३ मध्ये, आपण या प्रकरणी सुरुवातीला दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तक्रारीची दखल घेऊन दंडाधिकाऱ्यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु, लोढा हे सरकारमध्ये मंत्री असल्याने आणि एन. एम. जोशी मार्ग पोलीस राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने या प्रकरणाचा निष्पक्ष आणि मुक्त तपास होण्याची शक्यता नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोढा समूहाच्या प्रवर्तकांकडून आपल्याला धमक्या देण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.