मुंबई : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. जवळपास राज्यातून दोन हजार जादा बसगाडय़ा सोडल्या जातील. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते १८ ऑगस्ट रोजी जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवाशी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मार्गस्थ निवाऱ्यावर जादा वाहतुकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता काम  करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा