लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील तब्बल २००० शिक्षक पाठवण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जुलै महिन्यात घेतला होता. मात्र आता पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करीत तब्बल २००० शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून सरकारी पातळीवरून निवडणुकीच्या कामाची तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यात मतदार यादी अद्यायावत करण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबईसाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. शहर आणि उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कामासाठी पालिकेकडे २००० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. त्यापैकी शहर भागासाठी ६०० तर उपनगरसाठी १२०० कर्मचारी मागवले आहेत. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत नुकतेच परिपत्रक काढले असून शिक्षण विभागातील २००० कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने शिक्षकांच्या नावाने आदेश दिले आहेत.

आणखी वाचा-Water Crisis In Mumbai : एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) या कर्तव्यासाठी हे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातले तीन दिवस निवडणूक काम तर तीन दिवस पालिकेच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत.

दरम्यान, जुलै महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेकडे ८५०० कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यावेळी आधीच लोकसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर गेलेले कर्मचारी पूर्णपणे परतले नसताना आता विधानसभेसाठी कर्मचारी पाठवावे लागणार असल्यामुळे पालिका प्रशासनावर आधीच ताण आला होता. त्यावेळीही प्रशासनाने परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी पाठवण्याचे आदेश काढले होते. त्यात शिक्षकांना या कामातून वगळण्याबाबतचे स्पष्ट आदेश होते. मात्र आता तब्बल २००० शिक्षकांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात येणार आहे.

निवडणूक कामासाठी पाठवण्यात येणारे कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी निवडणुकीची कामे करतील. सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस पालिकेच्या आपल्या कार्यालयात उपस्थित राहून कामे पार पाडतील, असेही आदेश पालिका प्रशासनाने काढले आहेत.

आणखी वाचा-ईडी प्रकरणातही अविनाश भोसले यांना जामीन

शिक्षकांमध्ये नाराजी

लोकसभा निवडणूकीच्यावेळीही शिक्षकांना निवडणूकीच्या कामावर पाठवल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर शिक्षकांना या कामातून वगळण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर आठवड्याचे तीन दिवस निवडणूकीचे काम आणि तीन दिवस शाळा असा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा त्याच शिक्षकांना विधानसभा निवडणूकीसाठी पाठवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे या वर्षभराचे नुकसान होण्याची भीती शिक्षकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. आधीच पालिकेकडे शिक्षकांची कमतरता आहे. नवीन भरती प्रक्रिया विविध कारणांमुळे रखडली आहे. त्यात असलेले शिक्षक निवडणूक कामावर पाठवल्यास शिकवायचे कधी असा सवाल शिक्षकांनी केला आहे.