मुंबई : देशाच्या दृष्टीने गतवर्ष १९०१ पासूनचे सर्वांधिक उष्ण वर्ष ठरले. देशाच्या सरासरी तापमानात गतवर्षांत ०.६५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. देशाचे कमाल तापमान सरासरी ३१.२५ अंश सेल्सिअस असते, त्यात ०.४० ने वाढ झाली, तर किमान तापमान २०.२४ अंश सेल्सिअस असते, त्यात ०.९० अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, १९०१ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशाच्या सरासरी तापमानात ०.६५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. २०१६ मध्ये ०.५४, २०१९ मध्ये ०.४५, २१०१ मध्ये ०.३९ आणि २०१७ मध्ये ०.३८ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. २०२४ने सर्व उच्चांक मोडीत काढले. प्रामुख्याने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यातील किमान तापमानही सर्वांधिक होते. देशाचे कमाल तापमान सरासरी ३१.२५ अंश सेल्सिअस असते, त्यात ०.४० ने वाढ झाली, तर किमान तापमान २०.२४ अंश सेल्सिअस असते, त्यात ०.९० अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात देशातील सरासरी किमान तापमान १२.२७ अंश सेल्सिअस असते, ते २०२४ च्या डिसेंबरमध्ये १३.२२ अंश सेल्सिअस होते. देशाच्या सर्वच भागात डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यातही देशाच्या बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा…ज्वारीची पेरणी घटली; मका, करडईची वाढली जाणून घ्या, रब्बी हंगामातील पेरण्यांची पीकनिहाय स्थिती
े
जानेवारीत राज्यात थंडी कमीच
प्रामुख्याने महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता कमी आहे. राज्यभरात जानेवारीत सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील कच्छ, राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू, काश्मीर, लेह, लडाख, दिल्ली, उत्तराखड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखड आणि पश्चिम बंगालमध्ये जानेवारी महिन्यात सरासरीपेक्षा जास्त दिवस थंडीच्या लाटा येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यात अति जोरदार पावसाच्या (२०४.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस) ३० घटना घडल्या, तर जोरदार पावसाच्या (११५.६ ते २०४.५ मिमी) १४६ घटना घडल्या आहेत. कमी दाबाचे क्षेत्र, चक्री वादळामुळे पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडला आहे.
हेही वाचा…वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त
ला – निनाची पुन्हा हुलकावणी
प्रशांत महासागरात ला – निनाची स्थिती डिसेंबरअखेर तयार झाली नाही. जून २०२४ पासून ला – निना सक्रीय होण्याचा अंदाज जगभरातील हवामान विषयक संस्था व्यक्त करीत होत्या. तरीही ला – निना सक्रीय झाला नाही. आता ला – निनासाठी पोषक वातावरण असून, जानेवारी ते मार्च या काळात ला – निना सक्रीय होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.