मुंबई : सरलेले २०२४ हे वर्ष आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. २०२३ मधील सर्व उच्चांक मोडीत काढून औद्योगिकरण पूर्व काळापेक्षा गत वर्षांत तापमान सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सलग १३ महिने सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

युरोपीयन क्लायमेट एजन्सी कोपरनिक्सने म्हटले आहे, १८५० ते १९०० या औद्योगिकरण पूर्व काळातील सरासरी वार्षिक तापमानाच्या तुलनेत २०२३ हे वर्ष आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले होते. २०२३ मध्ये १.४५ अंश सेल्सिअसने तापमान जास्त होते. २०२३ च्या तुलनेत सरलेल्या २०२४ मध्ये ०.०५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन १.५० (१.५) अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. गत वर्षांत ४१ दिवस उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला, तर १३० दिवस लोकांनी उकाडा, उष्णतेच्या झळा अनुभवल्या. लहान बेटे, विकसनशील देशांना तापमान वाढीचा जास्त फटका बसला. वर्षभरात हवामान प्रकोपाच्या (टोकाचे हवामान. अति उष्णता, अति थंडी, अतिवृष्टी) २१९ घटना घडल्या. या घटनांमध्ये ३ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. भारतासह पाकिस्तान, दुबई, ब्राझील, व्हिएतनाम आणि मोरोक्कोच्या वाळवंटात अतिवृष्टीमुळे महापुराच्या घटना घडल्या. २०२४ या वर्षाने नजीकच्या भविष्यातील मोठ्या आणि विध्वंसक हवामान बदलाची चुणूक दाखवली आहे. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन या हवामान विषयक संस्थेनेही वरील महितीला दुजोरा दिला आहे.

Maximum temperature drop in Mumbai,
मुंबईच्या कमाल तापमानात घट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
pune cold spell in Pune subsided with temperatures rising and light rain expected from December 26
थंडीचा कडाका सरला, आता हलक्या पावसाची चिन्हे
low budget superhit movies of 2024
Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
2025 ruled by Mars
२०२५ वर मंगळ ग्रहाचे वर्चस्व; ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, प्रसिद्धी आणि आत्मविश्वास
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
thane farmhouses party loksatta news
सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी

हेही वाचा >>> वजनदार पत्र्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर, २० हून अधिक गाड्या पडल्या बंद

सलग १३ महिने सरासरीपेक्षा जास्त तापमानाचे

जगभरात सलग १३ महिने उष्णतेची लाट कायम होती. आफ्रिकन देश सुदान, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये तीव्र उष्णतेमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तीव्र उष्णतेने उत्तर कॅलिफोर्निया आणि डेथ व्हॅलीमध्येही कहर केला. दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांमध्ये तीव्र उष्णतेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. २५ मे रोजी राजस्थानमधील फालोदी येथे कमाल तापमान ४९ तर पाकिस्तानमधील जकोबाबाद येथे ५० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. या पूर्वी ओद्योगिकरण पूर्व काळाच्या तुलनेत १.४५ अंश सेल्सिअसने तापमान वाढ झाल्यामुळे २०२३ हे वर्ष आजवरचे उष्ण वर्ष ठरले होते. तर त्यापूर्वी १.२९ अंश सेल्सिअस तापमान वाढ झाल्यामुळे २०१६ हे वर्ष उष्ण वर्ष ठरले होते. २०१६ मध्ये प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रीय होता. एल- निनो आणि हरित वायूच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढ झाल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले होते. आता नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यासह मागील १३ महिने सरासरीपेक्षा जास्त उष्णतेचा सामना करावा लागला, असेही वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशनने म्हटले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास गती देण्याचे आदेश

… तर २०४० पर्यंत गंभीर स्थिती

हवामान बदलामुळे जगभरातील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. उष्णतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. अति थंडी, अति उष्णता, अतिवृष्टीमुळे पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळामुळे लोकांपुढील समस्या वाढल्या आहेत. जीवाश्म इंधन जाळत राहिल्यास आणि दरवर्षी सरासरी ०.०५ अंश सेल्सिअसने तापमान वाढ होत राहिल्यास २०४० पर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर होईल, असा इशारा वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो यांनी दिला आहे.

Story img Loader