लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसेच ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळांची व्यवस्थाही उपलब्ध आहे. कृत्रिम तलावात विसर्जनसाठी भक्तांकडून प्रतिसाद वाढत असून गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
Astrological Predictions Future of India 2024 and Narendra Modi Government in Marathi
Astrological Predictions India 2024 : ‘आर्थिक झळ ते मानसिक समस्यांमध्ये वाढ’; शनीची वक्रदृष्टी? भारताचे पुढे काय होणार? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दहा दिवसांच्या उत्सवासाठी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. त्यानुसार पालिकेने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्यावर्षी १९४ कृत्रिम तलाव होते व ७६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

आणखी वाचा-मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही पुरवली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित केल्यास जल प्रदूषण होते. त्यामुळे या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येते. तसेच कृत्रिम तलाव घराच्या आसपासच्या परिसरात असल्यामुळे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोयीचे ठरत आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रमाणही वाढत आहे. करोना व टाळेबंदीच्या काळात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन सक्तीचे करण्यात आले होते. त्यानंतर कृत्रिम तलावांची संख्या वाढत गेली.

यंदा गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदविण्यात येणार आहे. तसेच ‘क्यू आर कोड’द्वारे भाविकांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ह्यक्यू आर कोडह्ण गणेश मूर्तिकारांच्या मंडपा बाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात ३७१ टक्क्यांनी वाढ झाली असून पालिकेने गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे.

आणखी वाचा- मुंबई : पालिकेच्या एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती

भक्तांचा प्रतिसाद

कृत्रिम तलावांना वाढता प्रतिसाद गेल्या १० वर्षांत मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम तलावांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. २०१२ मध्ये केवळ २७ कृत्रिम तलाव होते. गेल्या १० वर्षांत ही संख्या वाढत जाऊन तब्बल २०४ वर गेली आहे. २०१२ मध्ये घरगुती व सार्वजनिक मिळून १६ हजार २७६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. तर गेल्यावर्षी ही संख्या ७६,७०९ होती.

वर्ष कृत्रिम तलावांची संख्याविसर्जित केलेल्या मूर्ती
२०१२ २७१६,२७६
२०१३ २७ २०,५५५
२०१४ २६ २१,१०७
२०१५ २६ ३०,३५९
२०१६ ३१ ३०,३५९
२०१७ ३१ २९,२८३
२०१८ ३२ ३४,५८४
२०१९ ३२ ३४,२२५
२०२० १६८ ७०,२३३
२०२१ १७३ ७९,१२९
२०२२ १५४ ६६,१२७
२०२३ १९१ ७६,७०९