लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्यात पोलिसांनी २४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली असून, यांपैकी हिशेब देण्यात आलेले पावणेतीन कोटी वगळता बाकी बेहिशेबी असल्याचा संशय असलेली २१ कोटी ६४ लाखांची रक्कम प्राप्तिकर विभागाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
पोलिसांनी राज्यभरात एकूण तब्बल २४ कोटी ३४ लाख १५ हजार २३९ रुपये इतकी जप्त केली. संबंधितांना या रकमेबाबत स्पष्टीकरण विचारण्यात आले असता, २ कोटी ७० लाख १४ हजार १८५ रुपये इतकी रक्कम कायदेशीर असल्याचे पुरावे त्यांनी दिले. उर्वरित २१ कोटी ६४ लाख १ हजार ५४ रुपयांची रक्कम बेकायदेशीर असल्याच्या संशयावरून निवडणूक आयोगाने ती प्राप्तिकर विभागाकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांच्या अमरावती मतदारसंघात वाहनातून नेण्यात येणारे १ कोटी रुपये पोलिसांनी पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या रकमेवर दावा करण्यासाठी कुणीच पुढे आले नव्हते.
आचारसंहिता काळात जप्त केलेले २१ कोटी रुपये प्राप्तिकर खात्याकडे
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्यात पोलिसांनी २४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली असून, यांपैकी हिशेब देण्यात आलेले पावणेतीन कोटी वगळता बाकी बेहिशेबी
First published on: 02-07-2014 at 12:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 crore seized during the period of code of conduct handover to income department