मुंबई : गेल्या दीड महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर २१ धमक्या आल्या आहेत. नुकतीच अजरबैजानला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवून प्रवासी प्रवास करत असल्याची धमकी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएफएफ) नियंत्रण कक्षाला आली होती. पण तपासणीत ती माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने व्हीपीएन नेटवर्कचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सीआयएसएफच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने अजरबैजानला जाणाऱ्या विमानतून मोहम्मद नावाची व्यक्ती सोबत स्फोटके घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली असता विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र तपासणीत ती माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यात व्हीपीएस नेटवर्कचा वपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा

हेही वाचा – पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा

मुंबईतील सहार व विमानतळ पोलीस ठाण्यात दीड महिन्यात सुमारे २१ धमकी अथवा खोटी माहिती दिल्याची प्रकरणे घडली असून त्यातील १८ प्रकरणांमध्ये व्हीपीएन नेटवर्कचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे २५० हून अधिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. याप्रकरणी आतापर्यंत २० गुन्हे दाखल झाले असून एका प्रकरणात सहार पोलिसांनी छत्तीसगडमधून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला पकडले होते. त्याच्यावर एक्स या समाज माध्यमावर एका व्यक्तीच्या नावाने खाते तयार करून धमकीचा संदेश पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीसोबतच्या जुन्या वादावरून त्याने त्याला अडवकण्यासाठी हा प्रकार केला होता. व्हीपीएनच्या वापरामुळे इतर प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.