मुंबई : शाळेतील वहीमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत लिहिल्यामुळे ७ वर्षीय मुलीवर झालेला लैंगिक अत्याचाराचा प्रकार शिक्षिकेच्या लक्षात आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार, धमकावणे व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वैद्यकीय शिक्षण विभागाची २०० कोटीची खरेदी वादाच्या भोवऱ्यात!

पीडित मुलगी ७ वर्षाची आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्यावर शेजारी राहणाऱ्या तरूणाने खेळण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत पीडित मुलीने तिच्या शाळेच्या वहीत एक पत्र लिहिले होते. ते शाळेतील शिक्षिकेने वाचल्यामुळे या घटनेबाबतची माहिती शिक्षिकेला मिळाली. त्यानंतर शिक्षिकेने याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना दिली. मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे सांगितले.