‘महावितरण’ने सुरू केलेल्या ऑनलाइन वीजदेयक भरणा सुविधेला ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबईवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला असून जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत तब्बल २१२ कोटी रुपयांचा महसूल या माध्यमातून जमा झाला आहे.
वीजदेयकांचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू झाल्यानंतर भांडुप परिमंडळातील ग्राहकांकडून त्यास लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे. घरबसल्या वा कार्यालयातून काही मिनिटांत विजेचे पैसे देण्याचे काम होत असल्याने महानगरी संस्कृती असलेल्या भांडुप परिमंडळात ऑनलाइन सेवा चांगलीच यशस्वी ठरली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०१३ या कालावधीत भाडुंप परिमंडळातील ठाणे नागरी मंडळातील सहा लाख ६१ हजार ग्राहकांनी १०६ कोटी ६० लाख २८ हजार रुपये ऑनलाइन जमा केले. तर वाशी मंडळातील सहा लाख ६१ हजार ग्राहकांनी १०५ कोटी ७३ लाख २२ हजार रुपये जमा केले.
ऑनलाईन वीजदेयकातून २१२ कोटींची कमाई
‘महावितरण’ने सुरू केलेल्या ऑनलाइन वीजदेयक भरणा सुविधेला ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबईवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला
First published on: 24-09-2013 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 212 crore payment of electricity paid through online