पश्चिम उपनगरातील रेल्वेच्या जोगेश्वरी यार्डात उभ्या असलेल्या एका लोकलमध्ये गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास २२ जिवंत काडतुसे सापडली असून रेल्वे पोलिसांनी ती ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. स्वातंत्र्यदिनी काडतुसे सापडल्यामुळे मुंबईत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
रेल्वे गाडय़ांमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला लोकलमध्ये ही काडतुसे सापडली. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांनी याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी ही २२ काडतुसे ताब्यात घेतली आहेत. ३८ बोअर रिव्हॉल्वरची ही काडतुसे आहेत. ती कोणी आणली याचा शोध पोलीस घेत
आहेत. प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद वस्तूला हात लावू नये. एखादी बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Story img Loader