मुंबई : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या महिलांची मुंबईत निवासाची योग्य सोय व्हावी याकरीता म्हाडाने पुढाकर घेतला असून अशा महिलांसाठी ताडदेवमध्ये एक वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची कार्यवाही २०२१ पासून सुरू होती, पण आता मात्र रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने ८० कोटी रुपये खर्चाच्या २२ मजली वसतिगृहासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पावठविण्यात येणार आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल.

मुंबईसह राज्यभरात परडणाऱ्या घरांचे प्रकल्प राबवून म्हाडाच्या माध्यमातून लाखो कुटुंबियांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून म्हाडाने विद्यार्थी आणि नोकरदार महिलांकरीता वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई मंडळाकडून काळाचौकी येथील जिजामाता नगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी २२ मजली, तर दुरूस्ती मंडळाने ताडदेव येथील एम.पी. मिल कम्पाउंड परिसरातील २००० चौरस मीटर जागेवर नोकरदार महिलांसाठी २२ मजली वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई मंडळाने यासंबंधीचा प्रस्ताव मान्य करून घेत, निविदा प्रक्रिया अंतिम करून २०२२ मध्ये वसतिगृहाच्या कामाला सुरुवात केली. हे काम सध्या सुरू आहे. मात्र दुसरीकडे दुरुस्ती मंडळाने ताडदेवमधील वसतिगृहाबाबत कोणतीही कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे ताडदेवमधील वसतिगृह २०२१ पासून रखडलेले आहे. आता मात्र दुरूस्ती मंडळाला जाग आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरदार महिलांसाठीच्या म्हाडाच्या पहिल्या वसतिगृहाचा आराखडा तयार करून अंतिम करण्यात आला आहे. तर वसतिगृहाचा प्रस्तावही तयार झाला आहे.

250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Transfers of 28 police officers before assembly elections 2024
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

आणखी वाचा-बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ

नोकरदार महिलांसाठी ताडदेवमध्ये बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचा प्रस्ताव लवकरच प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर वसतिगृहाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया अंतिम करून २०२५ मध्ये प्रत्यक्षात या वसतिगृहाच्या कामाला सुरुवात करण्याचे दुरूस्ती मंडळाचे नियोजन असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. एकूणच रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याने नोकरदार महिलांसाठी येत्या काही वर्षात निवाऱ्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

मंत्रालय, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी अशा परिसरात काम करणाऱ्या महिलांना त्याचा फायदा होईल, असा दावा करण्यात येत आहे. ताडदेव पोलीस स्थानकालगतच्या एम.पी.मिल कम्पाउंड परिसरातील संक्रमण शिबिराच्या जागेवर नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात दुरूस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या एकूण सात इमारती आहेत. या इमारती पाडून त्या ठिकाणी वसतिगृह उभारण्यात येणार आहे.

आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

६४५ महिलांची सोय

एम. पी. मिल कम्पाउंड परिसरातील संक्रमण शिबिराच्या २००० चौरस मीटर जागेवर २२ मजली वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या इमारतीत २१५ खोल्यांचा समावेश असणार असून यात ६४५ नोकरदार महिलांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. या वसतिगृहाच्या बांधकामासाठी ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वसतिगृहात महिलांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात पार्लर-सलून, स्वयंपाकघर, एटीएम सेंटर आणि इतर दुकानांचाही समावेश असणार आहे. या सर्व सुविधा इमारतीच्या तळमजल्यावर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Story img Loader