लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामानिमित्त आज आणि उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील २२ लोकल फेऱ्या रद्द आणि ४ लोकल फेऱ्यांमध्ये अंशत: रद्द होतील.
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त सुमारे ३५ दिवसांचा मोठा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान आज रात्री ११ वाजल्यापासून ते उद्या पहाटे ४ वाजेपर्यंत असा पाच तासांचा ब्लॉक असेल. आज रात्री १०.२४ चर्चगेट-बोरिवली, रात्री ११.२५ बोरिवली-चर्चगेट, रात्री ९.३२ बोरिवली-चर्चगेट, रात्री १०.३३ चर्चगेट-बोरिवली, रात्री ९.३६ विरार-अंधेरी, रात्री १०.३९ अंधेरी-नालासोपारा, रात्री १०.४३ बोरिवली-चर्चगेट, रात्री १०.१२ चर्चगेट-बोरिवली, रात्री ११.१५ बोरिवली-चर्चगेट, रात्री ९.४८ विरार-अंधेरी, रात्री ११.१२ अंधेरी-नालासोपारा, रात्री १०.१८ विरार-अंधेरी, रात्री ११.३७ अंधेरी-विरार, रात्री १०.५३ चर्चगेट-बोरिवली, रात्री १२.१० बोरिवली-चर्चगेट, सायंकाळी ७.५२ भाईंदर -चर्चगेट, रात्री ११.२१ चर्चगेट-भाईंदर, रात्री ९.५६ बोरिवली-चर्चगेट, रात्री ११.३८ चर्चगेट-भाईंदर, रात्री ११.४० विरार-अंधेरी, रात्री १२.४६ अंधेरी-भाईंदर या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
चार लोकल फेऱ्या अंशत: रद्द
आज रात्री ८.४१ चर्चगेट – बोरिवली मालाडपर्यंत चालवण्यात येईल. रात्री १०.३३ विरार-अंधेरी लोकल बोरिवली आणि अंधेरी दरम्यान जलद मार्गावर धावेल. रात्री १०.४४ विरार-अंधेरी लोकल बोरिवली चालवण्यात येईल. रात्री ११.५५ अंधेरी-विरार लोकल बोरिवलीवरून सुटेल.