एका २२ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. ७ जून रोजी मुंबईत ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुंबई : महापालिका कर्मचारी बनून टेलिफोन केबलची चोरी, ३५० मीटर रस्ता खोदला

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी तरुण हा मुंबईतल्या एका दुकानात काम करत असून हे दुकान पीडीत मुलगी राहते, त्याच भागात आहे. ७ जून रोजी दुपारी ही मुलगी काही वस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात गेली होती. त्यावेळी दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत, त्याने मुलीला दुकानात आत नेले, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर मुलीने वेदना होत असल्याचे तिच्या पालकांना सांगितलं होते. तसेच रविवारी आईबरोबर त्या दुकानासमोरून जात असताना तिने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी दुकानात पोहोचत आरोपीकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण लैंगिक अत्याचार केल्याचं मान्य केलं. तसेच त्याने त्या ठिकाणीहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- मुंबई : पर्यटन हौस महागात, व्यावसायिकाची पाच कोटींची फसवणूक

दरम्यान, स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७६ (३), ३७६ (अ), ३७६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 year old man sexually assaults 5 year old girl in mumbai arrested spb