कणकवली-कोल्हापूर आणि सावंतवाडी-बेळगाव या रेल्वे मार्गाबाबत कोकण रेल्वे समितीच्या बैठकीत चर्चा झाली तसेच जनशताब्दीला सावंतवाडीत जादा थांबा देण्यास मान्यता मिळाली असून राज्यराणी एक्स्प्रेसचे डबे १२ ऐवजी २३ करण्याचा प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यराणी (दादर-सावंतवाडी) एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात येणार आहे.जनशताब्दीला सावंतवाडीत जादा थांबा देण्यात येईल. त्यामुळे कुडाळव कणकवलीबरोबर सावंतवाडीतही थांबेल. कोकण कन्येला मडुरा व झारापला थांबा मिळावा म्हणून मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader