मुंबई : सर्वसाधारणपणे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारे इन्फ्लूएंजाचे रुग्ण यंदा संपूर्ण वर्षभर सातत्याने सापडत आहेत. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मृत्यूही वाढले आहेत. यंदा राज्यात २ हजार ३४६ रुग्ण सापडले असून त्यातील ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार संसर्गजन्य आजार वाढत असतात. साधारणपणे हिवाळ्यामध्ये फ्लूचे रुग्ण सापडत असतात. मात्र यंदा संपूर्ण वर्षभर राज्यात फ्लूचे रुग्ण अधूनमधून सापडत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गतवर्षी फ्लूचे १२३१ रुग्ण सापडले होते. तर ३२ जणांचा मृत्यू झाला. मात्र २०२४ मध्ये त्यात दुपटीने वाढ झाली आहे.
हेही वाचा >>> नवीन वर्ष उजाडण्याआधी कर भरा, मालमत्ता कर संकलन ५८ टक्के
२०२४ मध्ये राज्यात फ्लूचे २ हजार ३४६ बाधित रुग्ण सापडले तर ७२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात २०२४ मध्ये आतापर्यंत २३ लाख ५६ हजार ४०३ रुग्णांच्या फ्लूच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ६ हजार ४३ संशयित रुग्ण सापडल्याने त्यांना आसेलटॅमिवीर औषध देण्यात आले आहे. या संशयित रुग्णांमधून २ हजार ३४६ बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ७८५ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल पुणे ३६२ रुग्ण, ठाणे २८० रुग्ण, नाशिक २७४ रुग्ण, कोल्हापूर २६८रुग्ण आणि नागपूर १२२ इतके रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा >>> मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड, अनेक वातानुकूलित लोकल रद्द
राज्यात फ्लू मुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू नागपूरमध्ये झाले असून मृतांची संख्या २६ आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये २२ रुग्ण, काेल्हापूर ७, मुंबई व सातारा प्रत्येकी ५, छत्रपती संभाजी नगर ३ आणि अहमदनगर आणि जळगावमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका…
सतत खोकला येणे, थंडी येणे, ताप येणे ही एच१एन१ आणि एच३एन२ ची मुख्य लक्षणे आहेत. याशिवाय काही रुग्णांना वास न येणे, सतत थकवा जाणवणे, स्नायू दुखणे, घशामध्ये सतत खवखव होणे, सतत नाक वाहणे अशी महत्त्वाची लक्षणे असतात. अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
अधिक धोका कुणाला?
लहान मुले, महिला आणि वृद्ध लोक यांना अधिक धोका असतो. त्याचबरोबर हृदय किंवा फुफ्फुसचा आजार, मधुमेह अशा सहव्याधीने त्रस्त असलेले आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना इन्फ्ल्यूएंजाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. यासारखे लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
काय आहे इन्फ्लुएंजा किंवा फ्लू?
एच१एन१ आणि एच३एन२ हे दोन्ही इन्फ्लुएंजाचे उपप्रकार आहेत. एच१एन१ हा सामान्यतः स्वाइन फ्लू म्हणून ओळखला जातो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. एच३एन२ हा हाँगकाँग फ्लू या नावाने ओळखला जातो. या दोघांच्या लक्षणांमध्ये साम्य असते.