परदेशातील समुद्रकिनारे पाहून आपल्याकडेही असे स्वच्छ सागरीकिनारे का नाहीत?, असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. हाच प्रश्न मल्हार कळंबे या तरुणाला देखील पडला. आणि मग मल्हारने हाती घेतली मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम. वयाच्या १९व्या वर्षापासून मल्हार हे काम करतोय. यासाठी मल्हारने ‘beach please’ ही कम्युनिटी देखील स्थापन केली आहे. या कम्युनिटीद्वारे बीच क्लीन अप ड्राइव्ह ऑरगनाइज करून गेली २०९ आठवडे ते हा उपक्रम राबवत आहेत. चला तर मग मल्हारच्या या असामान्य कार्याबद्दल जाणून घेऊया.
गोष्ट अ’सामान्यांची या लोकसत्ता लाइव्हच्या सीरिजमधील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.