गेल्या ४८ तासात मुंबईत विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडय़ांमध्ये तब्बल २५ लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे. सायन येथील हायवे अपार्टमेंट मध्ये पंक ज अग्रवाल यांचे दुसऱ्या मजल्यावरील घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह वीस लाखांचा ऐवज लुटण्यात आला. खेरवाडी येथे रुबी वाईन शॉप हे बंद दुकान लुटून आतील सव्वा लाखांचा ऐवज लुटण्य़ात आला तर अंधेरी एमआयडीसी येथील दोन लाखांचे इलेक्ट्रीकल साहित्य चोरण्यात आले. अन्य एका घटनेत वाकोलाच्या प्रभात कॉलनी येथे राहणारे बिपीन येडनकर दिवाळीनिमित्त गुजराथ येथे गेले असतांना त्यांचे घर फोडून त्यातील सव्वा लाखांचा ऐवज लुटण्यात आला.     

Story img Loader