इंद्रायणी नार्वेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सागरीकिनारा मार्गासाठी बोगदा खणण्याच्या कामाला ११ जानेवारीला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ९० मीटर बोगदा खणण्याचे, तर एकू ण प्रकल्पाच्या २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र २१ हेक्टर अतिरिक्त भरावासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची (एमसीझेडएमए) परवानगी मिळालेली असली तरी केंद्र सरकारची परवानगी अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त भरावाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे १०.५८ किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग तयार केला जात आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारीला सुरुवात झाली. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत. बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.७ किमी असून खोदकामासाठी ‘मावळा’ हे ‘टनेल बोअरिंग मशीन’ वापरले जात आहे. या यंत्राने दीड महिन्यात ९० मीटर बोगदा खणण्याचे काम केले आहे. दरदिवशी पाच मीटर बोगदा खणणे अपेक्षित असून सुरुवातीच्या काळात यंत्राने वेग घेतला नव्हता. आता हे यंत्र वेगाने पुढे सरकू लागले आहे.दोन्ही बोगद्यांसाठी २० महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
परवानगीला विलंब
मूळ आराखडय़ानुसार प्रकल्पासाठी ९० हेक्टपर्यंत भराव टाकण्यासाठी आधीच परवानगी मिळाली आहे. मात्र आणखी २१ हेक्टरवर भराव टाकून तब्बल १११ हेक्टर जमीन तयार केली जाणार आहे. त्यास एमसीझेडएमएकडून परवानगी मिळाली असून ‘मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स’च्या परवानगीची अद्याप प्रतीक्षा आहे. या संदर्भात अद्याप बैठकच न झाल्यामुळे ही परवानगी मिळू शकलेली नाही, अशी माहिती सागरीकिनारा मार्गाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.
* ‘मावळा’ यंत्राद्वारे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर खोलीवर दोन बोगदे बांधण्यात येतील.
* बोगद्याचा एकूण व्यास १२.१९ मीटर असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास ११ मीटर इतका असेल.
* दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदेही असणार आहेत.
* ‘मावळा’ या संयंत्राची पाती ही प्रत्येक मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरू शकणारी आहेत.