चतुरंग प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी रंगसंमेलनात मुंबईसह राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या क्षेत्रांत निरलस वृत्तीने काम करणाऱ्या २५ सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. चतुरंगचे यंदाचे रंगसंमेलन मुंबईसह चिपळूण, डोंबिवली आणि गोवा येथे वेगवेगळ्या दिवशी आयोजित करण्यात आले आहे.
समाजाच्या विविध क्षेत्रांत निरलसपणे अनेक व्यक्ती काम करत असतात. त्यांचे हे काम ‘एकांडय़ा शिलेदारा’प्रमाणे सुरू असते. या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्याचे चतुरंग प्रतिष्ठानने ठरविले आहे. तसेच या सर्व कार्यकर्त्यांची कामाची माहिती असलेले एक पुस्तक मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील रंगसंमेलनात प्रकाशित केले जाणार आहे. २० डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रंगसंमेलनात अण्णा शिरगावकर- कोकण इतिहास संशोधन (दाभोळ), भाऊ काटदरे- प्राणिजीवन सुरक्षा (चिपळूण), आशा कामत- अंधांचे पुनर्वसन (मंडणगड), श्याम जोशी- वाचन संस्कृती (बदलापूर), नीतेश बनसोडे- अनाथांचे पुनर्वसन (अहमदनगर), रणजित शिंदे- अपघातग्रस्तांना आधार (पेठ-सांगली), भापकर गुरुजी- रस्तेनिर्मिती (पेठ-सांगली) यांचा सत्कार केला जाणार आहे. डोंबिवली येथे २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या रंगसंमेलनात मेजर गावंड- सैनिकी प्रशिक्षण (ठाणे), सदानंद काटदरे- शाळा निर्माण (वहाळ), सुनिता पाटील- बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार (नाशिक), राहुल देशमुख- अंधांसाठी काम (पुणे), प्रतिभा चितळे- नर्मदा परिक्रमावासीयांची सेवा (पुणे), कांचन सोनटक्के- मतिमंद मुलांसाठी नाटय़ प्रशिक्षण (विलेपार्ले), चारुदत्त सरपोतदार- नाटय़ व चित्रपटसृष्टीतील निराधार कलावंतांना आधार (पुणे), विजय जाधव- रेल्वे फलाटावरील मुलांचे पुनर्वसन (ठाणे), इरफाना मुजावर- वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन (कांदिवली), डॉ. ममता लाला- एचआयव्हीग्रस्त बालकांना मदत (अंधेरी) यांना गौरविण्यात येणार आहे.तर ३ जानेवारी रोजी गोवा येथे होणाऱ्या रंगसंमेलनात रमेश बुटेरे- आदिवासी मुलांचे शिक्षण (बदलापूर), गोकुळ देवरे- मतिमंद मुलांसाठी शाळा (मालेगाव), अनुराधा प्रभुदेसाई- सीमेवरील सैनिकांच्या कामाबाबत जनजागृती (पुणे), डॉ. विवेक भिडे- पर्यावरण संरक्षण (मालगुंड), राजेंद्र केरकर- पर्यावरण संरक्षण (गोवा), अमृत सिंह- प्राणिमित्र (गोवा), डॉ. सचिन तेंडुलकर- भटक्या-विमुक्त जमातीचे पुनर्वसन (गोवा), मंगला वागळे- पदपथावरील मुलांचे पुनर्वसन (गोवा) यांचा सत्कार केला जाणार आहे.मुंबईत १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या रंगसंमेलनात यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पारधी समाजाच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 social workers honor in chaturang silver jubilee colour festival