मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला असून २८८ मतदारसंघातून २,५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक इच्छुक विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. उमेदवारी अर्जाबरोबर प्रदेश काँग्रेसला जो पक्षनिधी प्राप्त झाला, त्याची रक्कम सुमारे ४० कोटींपर्यंत गेली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रदेश काँग्रेसने विधानसभा इच्छुकांना अर्ज पाठवण्याचे आवाहन केले होते. अर्जाची मुदत १० ऑगस्ट पर्यंत होती. प्रदेश काँग्रेसकडे १५०७ तर राज्यातील ३६ जिल्हा समित्यांकडे सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यामान आमदार आहे, तेथे इच्छुक कमी आहेत. ५७ राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे.

mhada Konkan Mandals lottery of 2264 houses
म्हाडा कोकण मंडळ सोडत २२६४ घरांसाठी १७ हजार अर्ज, अर्जविक्रीसाठी काही तास शिल्लक सोमवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
badlapur employee Registrar Cooperative Societies Office bribery case
लाचखोर सहाय्यक निबंधक आणि सहकारी अटकेत, गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी घेतली ६० हजारांची लाच
Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Verification,
विश्लेषण : ‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी कशी होणार? अनेक लाभार्थी अपात्र ठरणार? नाराजी सरकारला परवडणार का? 
CBSE Recruitment 2025: Registration for 212 Superintendent & Junior Assistant posts
१२ वी पास तरुणांसाठी नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी; CBSE मध्ये २१२ रिक्त जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा कराल?
Amravati Loan farmers, private lenders Amravati,
अमरावती : बँकांपेक्षा खासगी सावकारांकडूनच शेतकऱ्यांना कर्ज, तब्बल ९७.८१ कोटी…
Nagpur University, election application Nagpur University, education forum, Politics ,
नागपूर विद्यापीठात पुन्हा राजकारण तापले, शिक्षण मंचाच्या उमेदवाराचे निवडणूक अर्ज अवैध

हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठ अधिसभा स्थगित करण्याची शिंदे गटाची मागणी, मतदार नोंदणीत गोंधळ असल्याचा आक्षेप

विदर्भ आणि मराठवाड्यातून अधिक संख्येने इच्छुक आहेत. मुंबईतील ३६ मतदारसंघात २०० पेक्षा अधिक इच्छुक आहेत. वर्सोवामध्ये २२ आणि धारावीत १८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. प्रत्येक मतमदारसंघात सरासरी ८ ते १० इच्छुक आहेत. मात्र, राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण १५ ते २० पर्यंत आहे. प्रदेश काँग्रेसकडे आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये उच्चशिक्षित आणि महिला तरुण इच्छुकांचे यंदा मोठे प्रमाण आहे.

१९८९ पासून प्रदेश काँग्रेस विधानसभा इच्छुकांचे अर्ज मागवते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेला इच्छुकांचा अल्प प्रतिसाद होता. त्या तुलनेत यंदा मोठा प्रतिसाद लाभल्याचे प्रदेश काँग्रेस कार्यालयातून सांगण्यात आले. विधानसभा उमेदवारीसाठी खुल्या गटाला २० हजार आणि राखीव व महिला उमेदवारांना १० हजार पक्षनिधी अर्जाबरोबर द्यायचा होता. यंदा उमेदवारी अर्जातून प्रदेश काँग्रेसला किमान ४० कोटी रुपये पक्षनिधी मिळणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>गोविंदांना विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्याचे आवाहन, २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार

यावेळच्या लोकसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभेला काँग्रेस १०० पेक्षा अधिक जागांची मागणी आघाडीतील बैठकीत करणार आहे. काँग्रेसकडे सध्या ४५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे विद्यामान आमदार वगळता ५० ते ६० जागांसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस असणार आहे.

उमेदवारीला चार टप्पे

प्रथम विधानसभा उमेदवारी अर्ज जिल्हा निवड मंडळासमोर जातो. तेथे मुलाखती होतात. त्यानंतर प्रदेश निवड मंडळ त्यावर मत देते. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या छाननी समितीसमोर तो अर्ज जातो. तेथे चर्चा होते. अखेरीस मध्यवर्ती निवडणूक समितीमध्ये उमेदवारी निश्चित होते. या समितीमध्ये पक्ष अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि राज्य प्रभारी असे तिघे असतात.

Story img Loader