मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला असून २८८ मतदारसंघातून २,५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक इच्छुक विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. उमेदवारी अर्जाबरोबर प्रदेश काँग्रेसला जो पक्षनिधी प्राप्त झाला, त्याची रक्कम सुमारे ४० कोटींपर्यंत गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रदेश काँग्रेसने विधानसभा इच्छुकांना अर्ज पाठवण्याचे आवाहन केले होते. अर्जाची मुदत १० ऑगस्ट पर्यंत होती. प्रदेश काँग्रेसकडे १५०७ तर राज्यातील ३६ जिल्हा समित्यांकडे सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यामान आमदार आहे, तेथे इच्छुक कमी आहेत. ५७ राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे.
हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठ अधिसभा स्थगित करण्याची शिंदे गटाची मागणी, मतदार नोंदणीत गोंधळ असल्याचा आक्षेप
विदर्भ आणि मराठवाड्यातून अधिक संख्येने इच्छुक आहेत. मुंबईतील ३६ मतदारसंघात २०० पेक्षा अधिक इच्छुक आहेत. वर्सोवामध्ये २२ आणि धारावीत १८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. प्रत्येक मतमदारसंघात सरासरी ८ ते १० इच्छुक आहेत. मात्र, राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण १५ ते २० पर्यंत आहे. प्रदेश काँग्रेसकडे आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये उच्चशिक्षित आणि महिला तरुण इच्छुकांचे यंदा मोठे प्रमाण आहे.
१९८९ पासून प्रदेश काँग्रेस विधानसभा इच्छुकांचे अर्ज मागवते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेला इच्छुकांचा अल्प प्रतिसाद होता. त्या तुलनेत यंदा मोठा प्रतिसाद लाभल्याचे प्रदेश काँग्रेस कार्यालयातून सांगण्यात आले. विधानसभा उमेदवारीसाठी खुल्या गटाला २० हजार आणि राखीव व महिला उमेदवारांना १० हजार पक्षनिधी अर्जाबरोबर द्यायचा होता. यंदा उमेदवारी अर्जातून प्रदेश काँग्रेसला किमान ४० कोटी रुपये पक्षनिधी मिळणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>गोविंदांना विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्याचे आवाहन, २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार
यावेळच्या लोकसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभेला काँग्रेस १०० पेक्षा अधिक जागांची मागणी आघाडीतील बैठकीत करणार आहे. काँग्रेसकडे सध्या ४५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे विद्यामान आमदार वगळता ५० ते ६० जागांसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस असणार आहे.
उमेदवारीला चार टप्पे
प्रथम विधानसभा उमेदवारी अर्ज जिल्हा निवड मंडळासमोर जातो. तेथे मुलाखती होतात. त्यानंतर प्रदेश निवड मंडळ त्यावर मत देते. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या छाननी समितीसमोर तो अर्ज जातो. तेथे चर्चा होते. अखेरीस मध्यवर्ती निवडणूक समितीमध्ये उमेदवारी निश्चित होते. या समितीमध्ये पक्ष अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि राज्य प्रभारी असे तिघे असतात.