लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाचे मुंबई मंडळ २,०३० घरांच्या सोडतीसाठी गुरुवारी (८ ऑगस्ट) जाहिरात प्रसिद्ध करणार असून शुक्रवार, ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात होईल. इच्छुकांना ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल. हा २६ दिवसांचा कालावधी अत्यंत कमी आहे. इच्छुकांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी, अनामत रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागत असून अर्ज केवळ २६ दिवसांमध्ये भरावा लागेल. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा निकाल जाहीर करण्याच्या सरकारी आदेशातून सोडतीसाठी घाई करण्यात येत आहे. मात्र, या घाईचा थेट फटका इच्छुकांना बसण्याची शक्यता आहे.

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत

म्हाडाच्या घरांसाठी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात करण्यात येते. या प्रक्रियेसाठी अर्थात अर्ज भरण्यासाठी आणि अर्ज सादर करण्यासाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देणे अपेक्षित असते. त्यानुसार आजवर हा कालावधी देण्यात आला आहे. अनेक सोडतींना मुदतवाढही देण्यात आली आहे. म्हाडा सोडतीसाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी इच्छुकांना काही निश्चित कालावधी लागतो. जुन्या सोडत प्रक्रियेनुसार सोडतीत विजेते ठरल्यानंतर काही कागदपत्रे जमा करावी लागत होती. मात्र, आता सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चिती करून पात्र अर्जदारांनाच सोडतीत समाविष्ट केले जात आहे. त्यामुळे पात्रता निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे अर्ज भरतानाच सादर करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांची जमवाजमव करणे क्रमप्राप्त झाले आहे. अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेसाठी हा कालावधी कमी आहे.

आणखी वाचा-मुंबई : जाचक अटींमुळे गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षे परवाना दूरच

अनामत रकमेची जमवाजमव

जाहिरातीनुसार ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात होणार असून ही प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. त्यामुळे ४५ दिवसांऐवजी इच्छुकांना केवळ २६ दिवसांचा कालावधी अर्ज भरून तो सादर करण्यासाठी मिळेल. हा कालावधी अत्यंत कमी आहे. म्हाडाची ही प्रक्रिया ऑनलाइन आणि सोपी असली तरी आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी, त्यातही अनामत रकमेची जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांना वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक इच्छुक सोडतीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. आचारसंहितेपूर्वी सोडत काढावी यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याची चर्चा म्हाडामध्ये आहे. १३ सप्टेंबर रोजी घाईघाईत सोडत काढली जाईल

कालावधी पुरेसा

संपूर्ण सोडत प्रक्रिया ऑनलाइन असून आता आवश्यक ती कागदपत्रेही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहेत. त्यासाठी २६ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.