कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेला आंब्याचा २६ हजार किलोंचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.
कायद्यानुसार कार्बाईड कार्बाईडचा वापर करून फळे पिकवण्यावर र्निबध घालण्यात आला आहे. तरीही अनेक व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवतात. कार्बाईड शरीरासाठी घातक असून त्यामुळे डोळ्यांना जळजळ, त्वचेला खाज सुटणे यासारखे अनेक त्रास होऊ शकतात, इतकेच नव्हे तर कर्करोग आणि मज्जासंस्थेचे विकारही ओढवू शकतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने गेल्या १ एप्रिल ते ४ मे या कालावधीत आंब्याचे ४० नमुने गोळा करून कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा २३,६७८ किलो (किंमत ११,८५,३५४ रुपये) साठा जप्त केला. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ऑगस्ट २०११ ते मार्च २०१४ या कालावधीत अशा ३१ प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकारांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा