(

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पात्र विजेत्या भाडेकरुंना लवकरच घराचा ताबा

मुंबई : वर्षानुवर्षे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात राहणार्या २६५ भाडेकरुंचे हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. बृहतसूचीवरील २६५ पात्र विजेत्यांसाठी गुरूवारी पहिली संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीद्वारे २२५ चौ. फूटा (प्रत्येकी दोन) ते ७५३ चौ. फुटाची घरे वितरीत करण्यात येणार आहेत. लवकरच या घरांचा ताबा देण्यास सुरुवात होणार असल्याने कित्येक वर्षे संक्रमण शिबिरात राहणारे हे भाडेकरु आता हक्काच्या घरात रहायला जाणार आहेत.

हेही वाचा >>> वरळीतही होणार पालिकेचे बहुमजली भूमिगत वाहनतळ; महापालिकेने मागवल्या निविदा

दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक आणि कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील जे रहिवाशी अनेक वर्षे संक्रमण शिबिरात राहतात, काही ना काही कारणाने ज्यांच्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही वा होऊ शकणार नाही अशा भाडेकरुंसाठी बृहतसूची तयार करण्यात येते. या यादीतील अशा भाडेकरूना-संक्रमण शिबिरार्थींंना पुनर्विकासातून दुरूस्ती मंडळाला प्राप्त झालेल्या घरांपैकी घरांचे वितरण केले जाते. आतापर्यंत बृहतसूचीवरील घरांसाठी आँफलाईन पद्धतीने सोडत काढली जात होती. पण आता मात्र ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी संगणकीय पद्धतीने सोडत काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी म्हाडा भवनात बृहतसूचीवरील घरांसाठीची पहिली सोडत काढण्यात आली. दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते आणि सचिव राजकुमार सागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण अनिल वानखेडे यांंच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम पार पडला. पहिल्या संगणकीय सोडतीसाठी २६५ अर्जदार पात्र ठरले होते, तर त्यांच्यासाठी ४४४ घरे उपलब्ध होती. त्यानुसार ज्या अर्जदारांच्या घराचे मुळ क्षेत्रफळ ३०० चौ. फुटापेक्षा कमी होते त्या अर्जदारांपैकी ज्यांनी २५० चौ. फुटाची दोन घरे एकत्रित करुन घेण्यास समंती दर्शविली होती अशा १८ अर्जदारांसाठी ३६ घरे उपलब्ध करुन देण्यात आली. तर ज्या अर्जदारांचे घराचे मुळ क्षेत्रफळ ३०० चौ. फुटापेक्षा अधिक होते अशा ५२ अर्जदारांना ३०० चौ. फुटांची घरे देण्यात आली. या अर्जदारांनी आपणांस ३०० चौ. फुटाचीच घरे उपलब्ध करुन द्यावीत, वाढीव क्षेत्रफळासाठीची रक्कम नसल्याचे सांगत त्यांनी ३०० चौ. फुटांच्या घरांसाठी दावा केला होता. त्यानुसार ५२ अर्जदारांसाठी ३०० चौ. फुटाच्या घरांसाठी सोडत काढण्यात आली. तर उर्वरित अर्जदार हे ३०० ते ७५३ चौ. फुटाच्या घरांसाठी विजेते ठरले. आता विजेत्यांकडून स्वीकृती पत्र घेत पुढील प्रक्रिया पार पाडत त्यांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. मात्र त्याचवेळी १५ दिवसांत स्वीकृती पत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. तर देकारपत्र प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांत देकारपत्रातील नमूद अटीशर्तींची पूर्तता करत ताबा घेणे आवश्यक असणार आहे. अन्यथा त्यांचा बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार असल्याचे म्हाडा प्राधिकरणाने आपल्या २२ डिसेंबर २०२३ च्या परिपत्रकात नमुद केले आहे.