मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वेच्या महसुलावर आणि प्रवाशांना योग्य सेवा पुरवण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी नुकताच दादर स्थानकात मोठी कारवाई केली. तसेच मंगळवारी अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसांची फौज दाखल झाली आणि संपूर्ण दिवसभरात २,६९३ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. या विनातिकीट प्रवाशांकडून सात लाख १४ हजार ०५५ रुपये दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत एकाच स्थानकात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नांदेड मृत्यू घटना अन्य ठिकाणी होण्याची भीती, राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४४ टक्के पदे रिक्त

पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात १९५ तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले. या मोहिमेदरम्यान तब्बल १,६४७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून ४ लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मंगळवारी अंधेरी येथे १९९ तिकीट तपासनीसानी २,६९३ विनातिकीट प्रवशांना पकडले. त्यांच्याकडून सात लाख १४ हजार ०५५ रुपये दंड वसूल करण्यात आला. भारतीय रेल्वेमध्ये एकाच दिवशी एकाच स्थानकातील विनातिकीट प्रवाशांना पकडणे आणि त्यांच्याकडून दंडवसुली करण्याचा विक्रम तीन दिवसातच मोडला असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> ‘गोल्डन मॅन’साठी मुंबईकर एकवटले, पोलिसांच्या दमदाटीविरोधात थेट नडले; स्ट्रीट आर्टिस्टने VIDEOद्वारे सांगितलं वास्तव

पश्चिम रेल्वेवरून दररोज २८ ते २९ लाख प्रवासी प्रवास करतात. एकट्या अंधेरी स्थानकातून दररोज ३.५ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांमध्ये अंधेरी स्थानकाचा पाचवा क्रमांक लागतो. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी तिकीट तपासणी करण्यात आली, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2693 train travellers caught without tickets at andheri railway station mumbai print news zws
Show comments