मुंबईत विविध गुन्हयांत जामीनावर सुटलेले २६९७ आरोपी फरार असून झोपडपट्टयांच्या पुनर्विकासामुळे या आरोपींचा छडा लागत नसल्याची कुबली गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिली.
या फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून परिणामकारक मोहीम राबविण्यात येत असून २२२४ आरोपींना शोधण्यात यश आले. गेल्या सहा महिन्यात ३७३ आरोपींना पकडण्यात यश आले असून ७६ आरोपी मयत झाल्याचे आढळून आल्याची माहिती पाटील यांनी दिली. फरारी आरोपी आणि त्यांचे जामीनदार हे बहुतांश बेकादेशीर झोपडपट्टी, चाळीमध्ये राहणारे असतात. या झोपडय़ांवर महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. तसेच बऱ्याच चाळी आणि झोपडय़ांच्या पुनर्विकास झाल्यामुळे ही घरे विकून ते अन्यत्र स्थलांतर करतात त्यामुळे आरोपींचा शोध लागत नाही. तर मोठय़ा गुन्ह्यातील आरोपी जामीनावर सुटल्यानंतर परदेशात पळून जातात त्यामुळे या आरोपींना पकडण्यात अडचणी येत असल्याचेही आर. आर. पाटील यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
पोलिसांच्या हाती तुरी देऊन २६९७ आरोपी फरारी
मुंबईत विविध गुन्हयांत जामीनावर सुटलेले २६९७ आरोपी फरार असून झोपडपट्टयांच्या पुनर्विकासामुळे या आरोपींचा छडा लागत नसल्याची कुबली गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-08-2013 at 04:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2697 mumbai jail inmates out on bail missing rr patil