‘बेस्ट’ने २००९-१० या काळात खरेदी केलेल्या तब्बल २०० वातानुकूलीत बसगाडय़ांच्या व्यवहारात चांगलाच घोटाळा झाल्याचा हरकतीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केदार होंबाळकर यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीत मांडला. किंगलाँग कंपनीच्या या बस खरेदी करताना ‘बेस्ट’ने कंपनीला प्रत्येक बसमागे तब्बल १३.५० लाख रुपये जास्त मोजले असून यामागे कोण आहे, हे समोर आले पाहीजे, अशी मागणीही केली.
मात्र प्रशासनाने त्या वेळी बसच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम मोजली ही वस्तुस्थिती आहे. मात्र याबाबत चौकशी करण्याचे अधिकार महाव्यवस्थापक म्हणून आपल्याला नाहीत, असे सांगत ओमप्रकाश गुप्ता यांनी हा मुद्दा बाजुला ठेवला. तर बेस्ट समिती अध्यक्ष संजय आंबोले यांनी ‘या प्रकरणी सत्य असले, तरी तथ्य नाही’, असे सांगितले.
२००९-१० या वर्षांत ‘बेस्ट’ने ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत एक हजार बसगाडय़ांची खरेदी केली होती. त्या वेळी उत्तम खोब्रागडे ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक होते. या बसगाडय़ांपैकी २०० वातानुकुलित गाडय़ा किंगलाँग कंपनीकडून विकत घेण्यात आल्या होत्या. मात्र ‘जेएनएनयूआरएम’ने पैसे देताना काही रक्कम देण्यास नकार दिला. याबाबत ‘बेस्ट’ने विचारणा केली असता ‘बेस्ट’ने या किंगलाँग बसगाडय़ा तब्बल १३.५० लाख रुपये जास्त देऊन खरेदी केल्याचे समोर आले.
‘बेस्ट’च्या वातानुकूलित बसखरेदीत २७ कोटींचा घोटाळा?
‘बेस्ट’ने २००९-१० या काळात खरेदी केलेल्या तब्बल २०० वातानुकूलीत बसगाडय़ांच्या व्यवहारात चांगलाच घोटाळा झाल्याचा हरकतीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केदार होंबाळकर यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीत मांडला.
First published on: 22-01-2014 at 12:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27 cr scam in the purchase of an air conditioned bus in best