मुंबई : शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरीबांना घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यांत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात आतापर्यंत सुरू झालेल्या ३६६ आपला दवाखान्यांमध्ये २७ लाख ६६ हजार ७३७ रुग्णांनी मोफत उपचार घेतले. तसेच भविष्यात जिल्हास्तरावर आणखी ३३४ आपला दवाखाने कार्यान्वित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला मिळणारा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळता राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ७०० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १ मे २०२३ पासून आतापर्यंत एकूण ३६६ ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यात आले.

Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
Health Minister prakash Abitkar Guillain Barre Syndrome Pune contaminated well water Sinhagad road
सिंहगड रस्ता परिसरातील विहिरीतील दूषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस; आरोग्यमंत्री आबिटकर यांची कबुली
GBS , patients, Government , private hospitals ,
जीबीएस रुग्णांना दिलासा! खासगी रुग्णालयांतील उपचाराच्या खर्चावर सरकारचे नियंत्रण
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 

हेही वाचा – मुंबई : मागाठाण्यात ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेविका शिंदे शिवसेनेत

हेही वाचा – मुंबई : धरणांमध्ये निम्म्याहून अधिक साठा, सात धरणांमध्ये ५३ टक्के पाणीसाठा

राज्यातील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’मध्ये १ मे २०२३ ते २० जुलै २०२४ या काळात एकूण २७ लाख ६६ हजार ७३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ३ लाख ३९ हजार ४२५ रुग्णांची मोफत प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली, तर ४७ हजार ५६४ गर्भवती मातांची ‘आपला दवाखान्या’च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मंजूर ‘आपला दवाखान्यां’पैकी ३३४ दवाखाने जिल्हास्तरावर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे दवाखाने सुरू झाल्यानंतर अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ होईल, अशी माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली.

Story img Loader