मुंबई : रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर जवळपास २०१८ स्पर्धकांना वैद्यकीय मदतीची गरज भासली. त्यात पायात गोळे येणे, निर्जलीकरण आणि लहानसहान दुखापतींचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी एका रुग्णाला हृदयाचा त्रास सुरू झाल्याने त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.

प्रत्येक वर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदाच्या २० व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईसह देशविदेशातील नागरिक, सेलिब्रेटी, दिव्यांग, तरुणाई व वृद्ध व्यक्ती मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना योग्यवेळी वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे डॉक्टर, परिचारिका, फिजियोथेरेपिस्ट आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह ६०० स्वयंसेवकांची तुकडी सज्ज ठेवण्यात आली होती. मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा जवळपास ६२ हजार धावपटू सहभागी झाले होते. त्यातील २०१८ जणांना वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर २७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
Mumbai municipal corporation latest news in marathi
मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा
work of rural hospital in Khanivade which stalled for past ten years finally gained momentum
दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे रुग्णालयाच्या कामाला गती, ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय ; १३.३२ कोटींचा खर्च

हेही वाचा – सैफ हल्ला प्रकरणः सैफची सदनिका, इमारतीतून आरोपीचे १९ फिंगरप्रींट सापडले

वैद्यकीय मदतीची गरज भासलेल्या धावपटूंपैकी ५५ टक्के धावपटूंना पायात गोळे येणे, निर्जलीकरण आणि लहान दुखापती झाल्या. तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २७ जणांमध्ये हृदयविकाराचा झटका, रक्तस्राव, तीव्र निर्जलीकरण, अस्थिभंग झाल्याची माहिती एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधील हृदयविकार तज्ज्ञ व वैद्यकीय संचालक डॉ. संतोष कुमार डोरा यांनी सांगितले. बॉम्बे रुग्णालयात १५, लीलावती रुग्णालयात ५, पोद्दार रुग्णालयात २, जसलोक रुग्णालयात ३ आणि जी.टी. रुग्णालय व सैफी रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाला दाखल केले. त्यापैकी १६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. संतोष कुमार डोरा यांनी सांगितले.

बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी दोघांना तीव्र निर्जलीकरणाचा त्रास झाल्याने ते खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांना जीवरक्षक प्रणाली लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मॅरेथॉनमध्ये धावताना अचानक छातीत दुखू लागल्याने एका ४८ वर्षीय व्यक्तीला बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केली असता तातडीने अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्याची माहिती बॉम्बे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा – केंद्र सरकारच्या जमिनीवरील एक लाख ४१ हजार झोपड्यांचे २०३० पर्यंत पुनर्वसन

जी. टी. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला निर्जलीकरणाचा त्रास झाला होता. या रुग्णावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जी.टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र संकपाळ यांनी दिली.

Story img Loader